इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 ग्रामिण भागतील बांधकाम कामगारांनी ९० दिवस किंवा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून घ्यावे - प्रा. खाडे बी.जी.


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......ग्रामिण भागतील बांधकाम कामगारांनी ९० दिवस किंवा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून घ्यावे असे आवाहन बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष प्रा. खाडे बी.जी. यांनी केले आहे


      इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची महाराष्ट्र सरकारने २००७ मध्ये स्थापना केली. बांधकाम कामगाराच्या कल्यानासाठी २९ योजना मंडळ राबवत आहे. बांधकाम कामगारास कल्यानकारी मंडळात बांधकाम कामगार म्हणून नोंद करण्यासाठी मागील वर्षी ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. रजिस्टर्ड गुतेदार ( नोंदणीकृत ) गुतेदाराचे १० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नोंदणीसाठी चालते. परंतु जे कामगार नोंदणीकृत गुतेदारांकडे काम करत नाहीत त्यांना गुतेदार प्रमाणपत्र देत नाहीत. ग्रामीण भागातील रोज वेगवेगळया मालकाकडे काम करणारे बांधकाम कामगारानी ( नाका कामगार ) ग्रामसेवकांकडून व शहरी भागातील (नाका कामगारांनी) मुख्याधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र घ्यावे असे पत्रक सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यानकारी मंडळ यांनी २० फेब्रुवारी २०२१ मध्येच काढलेले आहे. असे असुनही बीड जिल्हयातील अनेक तालुक्यात व विशेषत परळी तालुक्यात ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नव्हते. प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांना आदेश द्या या मागणीसाठी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. संजय केंद्रे यांना निवेदन दिले. गटविकास अधिकारी श्री. संजय केंद्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्याकडून मार्गदर्शन मागीतले. दि. २७ जुलै२०२३ रोजी संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता उपमुख्य कार्यकारी अधिका-यांने घेतलेल्या निर्णयाची प्रत दिली. या पत्रकामध्ये ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे असे स्पष्ट केलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिका-याचे पत्र असल्यामुळे आता कोणताही ग्रामसेवक प्रमाणपत्र देणयाचे नाकारनार नाही.


         मुख्यकार्यकारी अधिका-यांच्या पत्रकाच्या आधारे परळीचे गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना पत्राव्दारे प्रमाणपत्र देण्याची सुचना १३ जुलै रोजी केली आहे. बीड जिल्हयातील सर्व ग्रामिण भागातील सर्व बांधकाम कामगारांनी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवका कडून घ्यावे व नोंदणी योग्य त्या संघटनेकडे अथवा योग्य व्यक्तीकडे करून घ्यावी. काही अडचन आल्यास ९४२२२४३८७८ अथवा ७८७५०८०३९९ नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!