उच्च शिक्षणातून आंतरराष्ट्रीय नागरिक तयार करावेत- डॉ. आर. टी. बेद्रे

 उच्च शिक्षणातून आंतरराष्ट्रीय नागरिक तयार करावेत- डॉ. आर. टी. बेद्रे        




       परळी प्रतिनिधी .....येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते म्हणून डॉ.आर.टी.बेद्रे संचालक, मानव संसाधन विकास केंद्र डॉ.हरिसिंग गौर विश्वविद्यालय सागर (मध्य प्रदेश) यांना आभासी पद्धतीने निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. राठोड, उपप्राचार्य प्रा हरिष मुंडे, डॉ बी.व्ही.केंद्रे, डॉ . पी. एल. कराड, डॉ जे.व्ही.जगतकर, प्रा.डी.के.आंधळे, डॉ. व्हि. जे. चव्हाण, डॉ व्ही.बी. गायकवाड, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात  डॉ. बेद्रे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आभासी पद्धतीने भाष्य करत असताना उच्च शिक्षणातून आंतरराष्ट्रीय नागरिक तयार झाले पाहिजे असे गौरव उद्गार या प्रसंगी काढले .डॉ बेद्रे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक  धोरणाची उद्दिष्ट यावर सखोल अशा प्रकारे विवेचन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच कौशल्यधिषठित विद्यार्थी निर्माण व्हावेत असे असेही भाष्य याप्रसंगी केले आहे .राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पारंपारिक तसेच नवीन ज्ञानाचा संगम असल्याचे सांगितले .त्याच बरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना अनेक आव्हान असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.डी.राठोड यांनी याप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविणे आव्हान असले तरी ते स्वीकारणे अनिवार्य असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक डॉ व्ही.जे.चव्हाण  यांनी केले तर आभार डॉ. व्ही.बी गायकवाड यांनी मांडले या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्त्तर कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

•••

VIDEO NEWS GALLERY 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार