धारुर:अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जागी ठार तर दुसरा उपचार साठी जाताना झाला मृत्यू

 अज्ञात वाहनाने उडवले: आपघातात दोघांचा मृत्यू


अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जागी ठार तर दुसरा उपचार साठी जाताना झाला मृत्यू


धारूर.... तातालुक्यातील खामगाव - पंढरपूर  राष्ट्रीय महामार्गावर आज 12 जुलै बुधवार रोजी बारा वाजेच्या दरम्यान सेलू तालुक्यातील झरी येथील मोटारसायकल  स्वार धारूर कडे येत असताना आंबेवडगाव येथे अज्ञात वाहनाने उडवल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा उपचार साठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. 

          खामगाव पंढरपूर महामार्गावरील धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे सेलू तालुक्यातील झरी या गावचे दोन युवक 12 जुलै बुधवार रोजी बारा वाजेच्या दरम्यान धारूर कडे येत असताना त्या दोन चाकी वाहनाला अज्ञात वाहणाने धडक दिल्याने भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये पंडित सुतारे वय वर्षे 38 यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याच दोन चाकी वाहनावरील अनिल अडागळे यांना 108 गाडी मधील डॉ अरविंद निक्ते, सुरज सावंत यानी तात्काळ धारूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ येथे घेऊन जात असताना अडागळे यांचा मृत्यू झाला. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !