युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

'युनिक' योग-'युनिक' शुभेच्छा.....!

 'युनिक' योग-'युनिक' शुभेच्छा: पंकजा मुंडेंनी केलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिष्टचिंतन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
         भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांचेही वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले असुन
पंकजा मुंडेंनी दोघांनाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा आज २२ जुलै रोजी एकाच दिवशी वाढदिवस आहे.सर्व स्तरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.दरम्यान भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांचेही वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले आहे. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस एकाच दिवशी हा योग युनिक आहे असे म्हटले आहे.तसेच हे वर्ष आपल्या नेतृत्त्वात महाराष्ट्राला उत्तम जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

• असे आहे पंकजा मुंडेंचे ट्विट.....
दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस एकाच दिवशी हा योग युनिक आहे.
@Dev_Fadnavisजी आणि @AjitPawarSpeaksजी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्या नेतृत्त्वात महाराष्ट्राला उत्तम जावो...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या