उत्स्फूर्त प्रतिसाद : पंकजा मुंडेंचा मध्यप्रदेशात झंझावात ; भाजपच्या संघटनात्मक  उपक्रमांत हिरिरिने सहभाग


      
    भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या मध्य प्रदेशात दौऱ्यावर असून मध्य प्रदेशात भाजपाच्या संघटनात्मक कामात त्यांनी झंझावात निर्माण केला आहे. ठिकठिकाणी पंकजा मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात भाजपने देशाच्या विविध क्षेत्रात केलेला अमलाग्र बदल व विकासात्मक वाटचालीचा प्रचार पंकजा मुंडे करताना दिसून येत आहेत.


        उज्जैन भागात आज पंकजा मुंडे यांनी ठिकठिकाणी भेटी देत संघटना कार्यक्रम उपक्रमांना हजेरी लावली आपल्या खास संघटनात्मक शैलीच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेशातही प्रचंड लोकप्रियता वाढीस लागल्याचे दिसून येत असून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा गराडा व उत्स्फूर्त स्वागत हेच दाखवून देत आहे. संघटनात्मक कार्यक्रम व उपक्रम आदींच्या माध्यमातून व आपल्या वक्तृत्वाने पंकजा मुंडे मध्यप्रदेशातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व उर्जा निर्माण करतानाचे चित्र दिसून येत आहे.

-----------------------------------------------------





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !