स्वओळख सिद्ध करावी-कविवर्य प्रा.अरुण पवार

 देशाची संस्कृती आणि संगीत युवकांनी जपावी- पंडित उद्धवबापू आपेगावकर



स्वओळख सिद्ध करावी-कविवर्य प्रा.अरुण पवार


परळी / प्रतिनिधी


देशाचे उज्वल भविष्य ज्यांच्या हाती आहे अशा बालकांनी आणि युवकांनी आपल्या देशाची संस्कृती आणि संगीत हे जपणे गरजेचे आहे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे पखवाज वादक पंडित उद्धवबापूआपेगावकर यांनी केले तर विद्यार्थी दशेपासून मुलांनी स्वतःची ओळख सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत कविवर्य प्रा.अरुण पवार यांनी केले.परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक कॉ. बापूसाहेबअण्णा देशमुख यांच्या 21 व्या स्मृती व्याख्यानमालेस प्रमुख आथिती म्हणून ते उपस्थित होते.


कॉ.बापुसाहेबअण्णा देशमुख यांचा 21 वा स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रम बुधवार दि 19 रोजी परळी तालुक्यातील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे संपन्न झाला.या व्याख्यानमालेस पंडित उद्धवबापू आपेगावकर,कविवर्य प्रा.अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीसह संस्थेचे सचिव कॉ. एड.अजय बुरांडे, जेष्ठ संचालक कॉ.सुदामदादा देशमुख, कॉ.सुदाम शिंदे, कॉ.सखाराम शिंदे, प्राचार्य धनंजय देशमुख, उप मुख्याध्यापक विनायक राजमाने, पर्यवेक्षक मुरलीधर बोराडे, प्रवीण देशमुख व संभाजी देशमुख आदींची उपस्थिती होती.


पुढे बोलताना पंडित उद्धवबापू आपेगावकर म्हणाले की, मुलांनी विचार करणे गरजेचे आहे,घोर चिंतन करणे गरजेचे आहे.आपले संगीत,आपली परंपरा ही परिपक्व असून प्रत्येकाने याला जपणे गरजेचे आहे.आज भारतीय संगीत हे आंतरराष्ट्रीय उच्च महाविद्यालयात शिक्षणासाठी उपलब्ध असून भारतीय व्यक्ती मात्र विदेशी संगीताचा प्रेमात पडलेत ही शोकांतिका आहे असे मत व्यक्त करीत शालेय विद्यार्थ्यांना शिका,मोठे व्हा पण सुसंस्कृत व्यक्ती म्हणून जीवन जगा असा सल्ला दिला.तर कविवर्य प्रा.अरुण पवार यांनी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी माझा कुठल्याच पवारा शी सबंध नाही असे सांगत उपस्थिताच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले.आपल्या वास्तववादी बहारदार कविता सादर करीत शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.शिक्षकांनी बालकांमधील सुप्त गुण शोधून त्यात विद्यार्थ्यांना कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा दयावी असे मत पवार यांनी व्यक्त केले.


या प्रसंगी शाळेतील विविध परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत स्वतःचे पर्यायी शाळेचे नावलौकिक केलेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या व्याख्यानमालाचे प्रस्तावित विनायक राजमाने, सूत्रसंचालन अंगद पेड्डेवाड तर आभार शिरीष तोंडारे यांनी केले. या व्याख्यानमालेस पंचक्रोशीतील शेतकरी,नागरिक,विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार