● अभिष्टचिंतन लेख: ✍️ जयदत्त नरवटे>>> 🟥 अजय मुंडे: लोकाभिमुख आणि संमजस नेतृत्व 🟥

 🟥 अजय मुंडे: लोकाभिमुख आणि संमजस नेतृत्व 



          राजकारण म्हटले की दिखाऊपणा आणि आपणच मोठे असल्याचे प्रदर्शन करणे हे दाखवण्याचा प्रयत्न आलाच. मात्र नेहमीच्या प्रकाराला जिल्हा परिषदेचे माजी गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते श्री. अजय मुंडे हे अपवाद आहेत. अतिशय शांत, संमजस आणि जनसामान्यात मिसळून काम करणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून अजय मुंडे यांना ओळखले जाते. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि परळी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे, त्यांचा आदेश शिरसावंद्य म्हणून काम करणारे अजय मुंडे हे अगदी सामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जातात. अजय मुंडे यांना लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब आणि जेष्ठ नेते स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्यापासून राजकारणाचे बाळकडू मिळालेले. माशाला पोहायला शिकवावे लागत नाही, तसे अजय मुंडे यांना राजकारण, समाजकारण सांगण्याची गरज निर्माण झाली नाही.

         अजय मुंडे यांनी अगदी सामान्य माणूस ते पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, अधिकारी अशा सर्वांशी जिव्हाळ्याचे, सलोख्याचे संबंध कायमच ठेवले आहेत. विशेष म्हणजे युवकांमध्ये ते लोकप्रिय असुन युवकांचे आयडाॅल ठरले आहेत. अजय मुंडे यांनी जिल्हा परिषदमथ्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून अतिशय प्रभावी काम केले आहे. कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या विकासाभिमुख कामांसाठी ते अहोरात्र प्रयत्नशील असतात, ते जिल्हा परिषद सदस्य असलेल्या गटातीलच नव्हे तर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रस्ते, बंधारे, पाणीपुरवठा योजना, शाळा, दलित वस्ती सुधार योजना यासह अनेक विकासाभिमुख कामे केली आहेत. त्यांनी वाण नदीवर राबविलेल्या बंधारा योजनेमुळे नाथ्रा, देशमुख टाकळी सह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

          जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि राज्य शासनाच्या विविध योजना यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. रो. ह. यो. विहीरी,घरकुल योजना, दिव्यांगांना स्कुटर रिक्षा, शेळी पालन अशा अनेक योजनांचा लाभ त्यांनी गरजवंतांना मिळवून दिला आहे. एक ना अनेक विकासाच्या योजनांचे ध्येय मनाशी धरून ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात लोकोपयोगी योजना अजय मुंडे यांनी राबवल्या आहेत.

कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक कार्यक्रमात अजय मुंडे हिरीरीने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीच करतात. ना. धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक संघर्षात अजय मुंडे हे कायम सोबत राहिले आहेत. त्यामुळेच आज ना.धनंजय मुंडे व अजय मुंडे यांचे अतूट नाते तर आहे. मुंडे कुटुंबातील ज्येष्ठ आणि वरीष्ठ म्हणून ना.धनंजय मुंडे सर्व परीचित आहेतच. अजय मुंडे यांच्या मितभाषी, संयमी व्यक्तीमत्वामुळे त्यांचेही आदराने नाव घेतले जाते. अजय मुंडे यांच्या मितभाषी, शांत, मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा चाहता वर्ग वरचेवर वाढत असून यामुळेच आज ते तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्य़ात आणि राज्यातही ओळखले जातात. त्यांच्या स्वभाव गुणधर्म व समाजाभिमुख काम करण्याच्या ओढीमुळेच म्हणावेसे वाटते "मेणाहुनी मऊ आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदू ऐसे" असे व्यक्तिमत्त्व अजय मुंडे यांचे आहे.

            अजय मुंडे यांनी ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून अनेकांना मदतीचा हात देऊन नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून व वैयक्तिक स्वरूपात अनेकांना मदत केली आहे. अजय मुंडे यांच्या विषयी आस्था, आपुलकी वाढतच असून विशेषतः तरुणांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण वाढत आहे. अजय मुंडे तालुक्यात अनेक वेळा क्रिकेट स्पर्धांसह विविध क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन करत असतात. ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात लोकोपयोगी, समाजाभिमुख विकास कार्यासाठी ते सदैव कार्यरत असतात. अजय मुंडे हे ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात नाथ प्रतिष्ठानच्या वतीने लोकप्रिय असलेला क्रिकेट खेळाचे डे-नाईट आयोजन केले आहे. यामुळे परळी तालुका व मतदार संघातील क्रिकेट खेळाडू तरूणांना खेळातील आपले कसब दाखवण्यासाठी एक मैदान, एक व्यासपीठच मिळते. अजय मुंडे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या हातुन उत्तरोत्तर असेच समाजाच्या हिताचे कार्य घडत राहो याच त्यांच्या जन्म दिनानिमित्त शुभेच्छा ...

                   ✍️- जयदत्त नरवटे

▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎▪︎

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार