सदोष व निकृष्ट बियाणांमध्ये नुकसान शेतकऱ्यास झाल्यास भरपाई देण्याची तरतूद करा- वसंत मुंडे



 परळी (प्रतिनिधी)

  महाराष्ट्र मध्ये २०१९ पासून आजतागायत अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांना बोगस निकृष्ट बी बियाणे,खत,औषधी पुरवून करोडो रुपयांना लुटले.नुकसान झालेल्या शेतकर्यांना कायद्यात भरपाईची तरतुद करावी अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.

 माजी कृषिमंत्री दादा भुसे व अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर मराठवाडा विदर्भात सोयाबीन व कापसाचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करून पेरणी करावी लागल्याने बियाणे उगवलेच नाही.याबाबत शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रारी करून ही आज तागायत नुकसान भरपाई दिली गेली नाही.कृषी खात्याचे संचालक व मुख्य गुणनियंत्रण व निविष्ठा कृषी आयुक्त कार्यालयामार्फत बोगस खत बियाणे औषधी पुरवणाऱ्या कंपन्यांना परवाने कोणी दिले याची चौकशी करावी व प्रयोगशाळेतील प्रमाणित अप्रमानीत अहवाल देणे बंधनकारक परवान्याच्या बाबतीत नियमावची तरतूद कायद्यात असतानाही बोगस कंपनीला परवाने कोणी दिले याची चौकशी मुद्दे निहाय करण्यासाठी अनेकवेळा मागणी करुनही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही कंपन्यांना आजतागायत काळया यादीत टाकले नाही यामुळे शेतकर्यांची लुट सुरुच असुन कंपन्यांच्या बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांसाठी त्रिमूर्ती सरकारने बनावट बि बियाणे खते औषधी  संदर्भात नवीन कायदा तयार करताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देण्याची तरतूद कायद्यामध्ये करून खास बाब म्हणून केंद्र शासनाकडे प्रस्ताव  पाठवा अशी मागणी वसंत मुंडे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार