परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार

 ना.अजित पवार-ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत 15 ते 22 जुलै दरम्याम शैक्षणिक सहाय्य सप्ताहाचे आयोजन - वैजनाथ सोळंके, बाजीराव धर्माधिकारी




वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार


परळी वैद्यनाथ (दि. 14) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान परळी तालुक्यात शैक्षणिक सहाय्य सप्ताहाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके व शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे.


दरम्यान राज्यात अजूनही शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 15 जुलै रोजीचा धनंजय मुंडे यांचा व 22 जुलै रोजीचा अजितदादा पवार यांचा, असे दोन्हीही वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय परळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला आहे.


यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहाय्य सप्ताह अंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन यासारख्या शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.


याव्यतिरिक्त पारंपरिक पद्धतीने प्रभू वैद्यनाथ अभिषेक, उमर शहावली दर्गा व हजरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण हेही उपक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच संत सावता बाबा मंदिरात मुंडे साहेबांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त 49 ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात येईल.


परळी शहरातील अभिनव विद्यालय येथून शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाची सुरुवात होणार असून या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे तसेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून या मदतीचे वितरण करावे असे आवाहन तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड तसेच शहराध्यक्ष सय्यद सिराज यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!