मणिपूर:आंदोलन

 मणिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ माकपची रविवारी परळीत निदर्शने


परळी / प्रतिनिधी 

   

मणिपुर राज्यात मागील तीन महिन्यापासुन हिंसाचार सुरू आहे. त्या राज्यातील सरकार व केंद्र सरकार हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्याचा विपरीत परीणाम तेथील महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्याच्या निषेधार्थ रविवारी दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे माकपची निदर्शने करण्यात येणार आहेत.



 मणिपुर राज्यात सत्तेत असलेले सरकार व केंद्र सरकार यांनी हिंसाचार थांबविण्यासाठी कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यातच महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक आत्याचार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्याने देशातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या हिंसाचाराचा माकप जाहिर निषेध करीत आहे. मणिपुर राज्य सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपुर राज्यातील हिंसाचार प्रकरणी निवेदन करावे व दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी व त्या राज्यात शांतता प्रस्थापीत करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलावीत या मागणीसाठी मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्षाच्या वतीने परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे रविवार दि२३ रोजी सकाळी ११ वा निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माकपचे कॉ.पी एस घाडगे व कॉ.परमेश्वर गीत्ते यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !