अधिकाऱ्यांचे गाव होईल यासाठी प्रोत्साहन देवू- ॲड. गोविंद फड

 फौजदार झाल्याबद्दल प्राजक्ता फड चा धर्मापुरी ग्रा.पं च्या वतीने सत्कार

अधिकाऱ्यांचे गाव होईल यासाठी प्रोत्साहन देवू- ॲड. गोविंद फड

परळी 


अत्यंत मेहनत, कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रचंड अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उच्चतम गुण प्राप्त करून फौजदार पदी निवड झाल्याबद्दल धर्मापुरी गावची कन्या प्राजक्ता महादेव फड हिचा बुधवारी ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, धर्मापुरी हे गाव अधिकाऱ्यांचे गाव बनवू.. असा विश्वास सरपंच तथा परळी पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. गोविंदराव फड यांनी व्यक्त केला.


परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील महादेव लिंबाजी फड (महादू गुरुजी) यांची कन्या प्राजक्ता फड हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून यश मिळवत फौजदार पदाला गवसनी घातली आहे. 


या यशाबद्दल धर्मापुरी ग्रामपंचायत च्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच फेटा बांधून आज सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरुन ॲड. गोविंदराव फड बोलत होते.


समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. यावेळी धर्मापुरी चे विकासाभिमुख नेतृत्व तथा लोकप्रिय सरपंच माननीय ऍड. गोविंदराव फड यांच्यासह सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी गोरे साहेब तसेच गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित होते. यावेळी प्राजक्ताच्या आई-वडिलांचा ही ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !