अध्यक्षा सौ.रमा आनंद आलदे यांचा पुढाकार

 श्री शंभू महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळाकडून विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा


अध्यक्षा सौ.रमा आनंद आलदे यांचा पुढाकार

परळी (प्रतिनिधी)

परळीच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती राधाबाई बियाणी व वैद्यनाथ बँकेच्या संचालिका सौ. सुरेखाताई मेनकुदळे यांना अंबेजोगाई येथील दि.वा. संस्थेच्या वतीने श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तर ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांची अ.भा.वारकरी मंडळाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड व विरशैव सभा शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.उमाताई समशेट्टे तर श्री काशी जगद्गुरू विश्वराध्य वीरशैव विद्यापीठ, वाराणसी वीरशैव सिध्दांत परिक्षा, बीड जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्या बद्दल सौ.चेतनाताई गौरशेटे यांचा शंभू महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळाच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात बालकिर्तनकार जनाई कोकाटे यांचाही गौरव करण्यात आला.

परळी शहरातील नामांकीत अशा शंभू महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळाच्या वतीने या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा सौ.रमा आनंद आलदे यांच्या पुढाकारातून त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी श्रीमती शारदा प्रभाकर तिळकरी, सौ.उमा उत्तमराव मिटकरी, सौ. जयदेवी महालिंगअप्पा मिसाळ,सौ.वंदना योगीराज मिसाळ, सौ.राजश्री सुभाष भिंगोरे, सौ.सुरेखा धनराज भिंगोरे, सौ.प्रभावती विश्वनाथ लव्हराळे, सौ.शालिनी सोमनाथ वड्डे, सौ.सत्यभामा उध्दव पाळवदे, सौ.मनकर्णिका मल्लिकार्जुन साखरे, सौ.शोभा धनराज तरवडगे, सौ.चंद्रकला सुभाष वाघमारे, सौ.ललिता ज्ञानेश्वर वेरूळे, सौ.श्रीदेवी शिवराज बर्दापुरे, सौ.उज्वला अमर आलदे, सौ.उज्वला वैजनाथ काटकर, सौ.कमल सोमनाथ ओपळे उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार