परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ना.धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी यांचे मानले आभार

 दिव्यांगांच्या खात्यात अंबाजोगाई नगरपालिकेने २५ लाख तर परळी वैजनाथ नगरपालिकेने ६ लाख रुपये केले वर्ग - डॉ. संतोष मुंडे 


ना.धनंजय मुंडे  व जिल्हाधिकारी  यांचे मानले आभार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शासनाने दिव्यांगांसाठी स्वनिधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने दोन २०१८ साली पारित केला होता. त्यानुसार मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील नगरपालिकांकडून दिव्यांगांना लाखो रुपयांची मदत झाल्याची माहिती धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली.

        दिव्यांगांच्या खात्यात अंबाजोगाई नगरपालिकेने तब्बल २५ लाख तर परळी वैजनाथ नगरपालिकेने ६ लाख रुपये केल्याचीही माहिती डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे. बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या दिव्यांगांच्या योजनेबाबत निरुत्साही असतात. मात्र ना. धनंजय मुंडे हे सातत्याने दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी संवेदनशील आहेत, सोबतच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यादेखील आस्थेने दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. तसेच संबंधित ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड व नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्री. कांबळे व मुख्यधिकारी अशोक साबळे यांनी दिव्यांगांप्रति दाखवलेले कर्तव्यनिष्ठतेसाठी सर्व मान्यवरांचे डॉ. संतोष मुंडे यांनी आभार मानले आहेत. परळी व अंबाजोगाई शहरातील दिव्यांगांच्या ज्यांच्या कोणाच्या खात्यावर जर अनुदान पडले नाहीत तर डॉक्टर संतोष मुंडे मोबाईल 9822280568 या नंबरवर संपर्क साधावा. परळी व अंबाजोगाई येथील दिव्यांगांच्या खात्यावर  केल्याबद्दल  राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार धनंजय मुंडे जिल्हाधिकारी मॅडम, ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड मुख्याधिकारी डॉ.संतोष मुंडे यांचे विशेषता दिव्यांग बांधव  साजन लोहिया, अनंत लोखंडे, विष्णू आघाव, रामलिंग घनचक्कर, सय्यद सुभान, जावेद सय्यद, दिगंबर नागराळे, रवींद्र जगतकर,, सुनिता कवले, शीला धायगुडे, सुरेश गवते, दीपक धोकटे, अमोल जोशी, प्रशांत घेवारे, अशा नागरगोजे, संजय जाधव, तुळशीराम प्रयाग, प्रकाश टिके, संजय नखाते, लोढा अरिहंत, संतोष बल्लाळ, उद्धव फड, संदेश कापसे, प्रमोद आमले, अभिजीत स्वामी, संजय घोबाळे, दत्ता काटे यांनी आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!