बीड: स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

 घरफोडया उघडकीस आणून आरोपीस केले जेरबंद




बीड, प्रतिनिधी
मागील चार ते पाच महिण्याचे कालावधीत बीड शहरात मोठया प्रमाणावर मालमत्तेचे गुन्हे घडले असून ते उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हेगार निष्पन्न करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या आहेत. त्यावरुन पो.नि. स्थागुशा, बीड यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी, अंमलदार यांची पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. त्यावरून बीड शहरात गुन्हेगारांचा शोध घेत असताना दिनांक 22/07/2023 रोजी  पोलीस निरिक्षक स्थागुशा बीड यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, इसम नामे राम बन्सी नवले रा. आहेर धानोरा ता बीड याने बीड शहरामध्ये बऱ्याच घरफोडया केल्या आहेत व तो सध्या पालवण चौकामध्ये उभा आहे. अशी माहिती मिळालेवरुन पो. नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने माहिती काढून योग्य सापळा लावून एका इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता याने त्याचे नाव राम बन्सी नवले रा. आहेर धानोरा ता बीड असे सांगीतले. त्यास विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने पोलीस ठाणे शिवाजीनगर हीत पालवण चौक, त्रिमुर्ती कॉलनी. भक्ती कन्ट्रक्शन, स्वराज्य नगर, रायगड कॉलनी व इतर ठिकाणी आठ ते दहा ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडुन घरफोडया केल्याचे कबुल केले आहे. व गुन्हयामध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागीने मी बीड शहरातील जुनी भाजीमंडई येथील सराफ सिध्दश्वर शिवाजी बेद्रे व प्रशांत प्रकाश डहाळे यांना दिलेले आहे असे सांगीतले आहे तसेच आम्ही पो.स्टे. चे अभिलेख पाहता पो.स्टे. शिवाजीनगर येथे गुरन 1 ) 361/20232) 307/2023 कलम 454,457, 380 भादवि तसेच इतर गुन्हे दाखल असुन सदर आरोपी व सराफ यांना पो.स्टे. शिवाजीनगर बीड गुरनं 361 / 2023 कलम 454,457, 380 भादंविचे गुन्हयात दि. 22/07/2023 रोजी हजर केले आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपीने दिलेले सोन्याचे दागीने सराफाकडुन दोन तोळे, चोरी गेलेले मोबाईल, इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी व दोन्ही सराफ यांना न्यायालयाने पो.स्टे. शिवाजी नगर गुरन 307 / 2023कलम 454,457, 380 भादवि मध्ये दिनांक 31/07/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील अधिकारी करीत आहेत. गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल व इतर आरोपी शोध संदर्भाने तपास चालू आहे.

सदर ची कामगीरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड,  सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री. संतोष साबळे पोलीस निरीक्षक स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, पोलीस अंमलदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आधळे, विकी सुरवसे, अशोक कदम, सलिम शेख, देविदस जमदाडे, नसीर शेख, राहुल शिंदे यांनी केली.

•••







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !