चांद्रयान-3 'लाइव्ह स्ट्रीमिंग'ने केला नवा रेकॉर्ड...

 चांद्रयान-3 'लाइव्ह स्ट्रीमिंग'ने केला नवा रेकॉर्ड...


भारताच्या चांद्रयान-3 ने बुधवारी (दि. २३) चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. त्याचबरोबर इस्रोच्या लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकनेही यूट्यूबवर इतिहास रचला आहे. चांद्रयान- 3 च्या लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग एकाच वेळी ८.०६ दशलक्ष लोकांनी पाहिले. या लाईव्ह स्ट्रीमिंगने यूट्यूब (YouTube) इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा हा थेट प्रक्षेपण ( लाईव्ह) ठरले आहे. (ISRO YouTube)

ISRO YouTube : भारताने पुन्हा एक इतिहास रचला

आतापर्यंत YouTube वर, ब्राझील वि. कोरियाच्या फुटबॉल सामन्याचे थेट प्रक्षेपण ६.१५ दशलक्ष लोकांनी एकावेळी पाहिले होते. ज्याचा बुधवारी (दि. २३) चांद्रयान- 3 च्या थेट प्रक्षेपणाने विक्रम मोडला आहे. यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला ब्राझील विरुद्ध क्रोएशिया फुटबॉल सामना जो एकाच वेळी ५.२ दशलक्ष लोकांनी पाहिला होता.

YouTube वर आतापर्यंत सर्वाधिक पाहिलेले लाइव्ह स्ट्रीमिंग

इस्रो चांद्रयान : ८.०६ दशलक्ष

ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया फुटबॉल सामना : ६.१५ दशलक्ष

ब्राझील विरुद्ध क्रोएशिया फुटबॉल सामना:

५.२ दशलक्ष

वास्को विरुद्ध फ्लेमेन्गो फुटबॉल सामना: ४.८ दशलक्ष

SpaceX क्रू डेमो : ४.८ दशलक्ष

इस्रोच्या अधिकृत YouTube चॅनेलवर चांद्रयान-3 च्या लँडिंगपूर्वी, सदस्यांची संख्या २.६८ दशलक्ष म्हणजे सुमारे २६ लाख होती, जी यशस्वी लँडिंगनंतर आता ३५ लाख झाली आहे. लँडिंगचे थेट प्रक्षेपण सुमारे एक तास ११ मिनिटे चालले आणि केवळ एका तासात इस्रोने नऊ लाख सदस्य मिळवले. इस्रोचे थेट प्रक्षेपण एकाच वेळी पाहणाऱ्या सदस्यांच्या संख्येपेक्षा तिप्पट आहे.


चांद्रयान- 3 लाईव्ह उत्स्फूर्त प्रतिसाद

• YouTubeवर चांद्रयान- 3चे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या ९ मिनिटांत २.९ दशलक्ष लोक चॅनेलवर सक्रिय झाले होते.

• १३ व्या मिनिटांत थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी ३.३ दशलक्ष लोकांनी यूट्यूब ट्युन केले होते.

• १७ व्या मिनिटात सुमारे ४० लाख लोक लाइव्ह

सामील झाले होते.

• ३१ व्या मिनिटांनंतर, ५.३ दशलक्षाहून अधिक म्हणजे ५३ लाख लोक इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर थेट सामील झाले.

• ४५ व्या मिनिटांनंतर, ६.६ दशलक्ष लोक थेट प्रक्षेपण पाहत होते. यानंतर काही मिनिटांतच प्रेक्षकांची संख्या ८० लाखांवर पोहोचली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार