नमामी वैद्यनाथम........!

 श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य आमंत्रित ट्रस्टी दिनेश चंद्रजी यांनी घेतलं प्रभु वैद्यनाथ दर्शन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
              राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संरक्षक व मार्गदर्शक तथा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य आमंत्रित ट्रस्टी  श्री दिनेश चंद्रजी यांनी आज (दि. ११ ऑगस्ट २०२३)   परळी वैद्यनाथ येथे प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
         श्री दिनेश चंद्रजी यांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेऊन सकल हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी व ज्वलंत हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी मनोभावे प्रार्थना केली. श्री दिनेश चंद्रजी यांचा प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा देऊन यथोचित स्वागत व सत्कार श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने  राजेश देशमुख यांनी केला.श्री दिनेश चंद्रजी यांच्या समवेत श्री हरी मोहनजी (सहाय्यक),  श्री. किशोर कुलकर्णी (लातूर विभाग संघटन मंत्री),  श्री. नागनाथ बोंगरगे (पूर्ण वेळ प्रचारक, पुणे विभाग),  शैलेश पांडे (जिल्हा सहमंत्री) तसेच परळी वैद्यनाथ प्रखंडातील पदाधिकारी वर्ग व परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार