प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

मोहनलाल बियाणी यांच्या जयंती

 मोहनलाल बियाणी यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन- चंदुलाल बियाणी



परळी वै. ता. १६ प्रतिनिधी

       मराठवाडा साथीचे मुख्य संपादक मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्त शनिवारी (ता.१९) परळीत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

      मोहनलालजी बियाणी यांच्या जिवनचरित्रावर ह.भ.प.भरत महाराज जोगी यांच्या वाणीतुन व्याख्यान होणार आहे. कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप, पोद्दार लर्न स्कुल मध्ये एक दिवसासाठी स्विमींग पुल मध्ये पोहचण्याची सोय, मृदंग स्पर्धा, गायन स्पर्धा, उत्कृष्ट बाल किर्तन पुरस्कार, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, शालेय साहित्य वाटप व त्यांच्यासाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांचे आयोजन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.

..............

..........







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या