इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 जागृत विद्यार्थ्यांच्या मतदानाच्या अधिकारातून उज्वल राष्ट्र निर्माण होते- तहसीलदार संदीप पाटील   




परळी, प्रतिनिधी....

जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही विषयी जनजागृती घडून आणण्यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.आर डी राठोड, प्रमुख मार्गदर्शक परळी नगरीचे तहसीलदार श्री संदीप पाटील मंडल अधिकारी श्री कुमुटकर, उपप्राचार्य हरिष मुंडे, प्रा.डी के आंधळे, प्रा उत्तम कांदे, प्रा मंगला पेकंमवार यांची उपस्थिती होती.एक ऑगस्ट पासून महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह साजरा करीत आहे . सप्ताह च्या माध्यमातून युवा वर्गामध्ये संवाद साधण्यासाठी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी.के आंधळे यांनी  लोकशाहीच्या तंत्र या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व लोकशाहीचे महत्त्व ही आजच्या काळाची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तहसीलदार संदीप पाटील यांनी तरुणांनी या स्पर्धेच्या युगात जागृत राहिले पाहिजे . जागृत विद्यार्थ्यांच्या मतदानाच्या अधिकारातून उज्वल राष्ट्र निर्माण  होऊ शकते असे मत प्रतिपादन केले. त्याचबरोबर आधार कार्ड मतदान कार्ड याविषयी युवकांनी जनजागृती करावी असे सांगितले. आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे, प्रत्येक तरुणाने आज जागृत राहणे आवश्यक आहे .त्याचबरोबर हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यासंग्रामात ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी कार्य केले त्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांनी स्वतः करून घ्यावी थोर महात्म्यांचे चरित्र वाचावे असे सांगून ज्या विभागात आपण राहतो त्या मराठवाड्याचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे युवकांनी जागृत झाल्याशिवाय देशाचा विकास कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत आपल्याकडे असलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना समोरताना असे सांगितले. युवकांनी आपल्या अधिकारावर विषयी व हक्काविषयी जागृत राहिले पाहिजे आणि त्या संदर्भात जनजागृती ही केली पाहिजे या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ आर.डी राठोड यांनी शासनाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना घरापर्यंत पोहोचण्याचा काम केले जात  आहे तसेच सुशिक्षित व बेरोजगार यांना शासनाच्या विविध योजनेची माहिती या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे असे याप्रसंगी सांगीतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना चव्हाण तर आभार महाविद्यालयाचे उप प्राचार्य हरीश मुंडे यांनी मानले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!