बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात बैठकांचे सत्र

 बीड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली लोकप्रतिनिधींशी चर्चा


*कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.प्रकाशदादा सोळंके, मा.आ.अमरसिंह पंडित, मा.आ.संजय दौंड, राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती

धनंजय मुंडेंच्या दालनातही बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात बैठकांचे सत्र



मुंबई (दि. 24) - बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरण कडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. 


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आ.प्रकाशदादा सोळंके, मा.आ.अमरसिंह पंडित, मा.आ.संजय  दौंड, राजकिशोर मोदी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या सर्वांनीच बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांसह अन्य प्रस्तावित व तातडीची कामे तसेच दुष्काळी परिस्थिती संदर्भात माहिती दिली.


यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचे अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत. 


दरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात महापारेषण व संचालन विभागाकडील प्रलंबित विषयासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्याही बैठकीस बीड जिल्ह्यातील आजी माजी आमदार व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 


माजलगाव धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्रास पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात देखील आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात बैठक पार पडली. 


*बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी याआधीही सांगितले होते. त्याला अनुसरून मंत्रालयात बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भात विविध बैठकांचे सत्र सुरू आहे.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !