मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा घेणार

 राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात घेणार मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात घेणार बैठक, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेही राहणार व्हर्च्युअली उपस्थित


मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा घेणार


छत्रपती संभाजीनगर (दि. 24) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सध्या मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा शुक्रवारी आढावा घेणार आहेत. 


राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हेही या बैठकीस व्हर्च्युअली उपस्थित राहणार असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील मंत्रीही या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


या बैठकीत बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव या आठही जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, ओढ दिलेल्या क्षेत्रात पिकांची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदी सर्वच विषयांवर व्यापक चर्चा व निर्णय होणे अपेक्षित आहे. 


या बैठकीस कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, यांसह अन्य मंत्री महोदय, तसेच विभागीय आयुक्त, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त, तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांसह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार