मृद, वनस्पती पाणी व उती तपासणी

 मृद, वनस्पती पाणी व उती तपासणी प्रयोगशाळा

     बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-   जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र दहा लाख 68 हजार 67 हेक्टर आहे जिल्ह्याचे लागवडी खालील क्षेत्र 8 लाख 76 हजार हेक्टर आहे. यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 85 हजार हेक्टर तर रब्बी हंगामाची सरासरी क्षेत्र 3 लाख 78 हजार हेक्टर आहे. उन्हाळी हंगाम क्षेत्र 32 हजार हेक्टर व सिंचना खालील क्षेत्र 12 हजार  हेक्टर असून 20 हजार हेक्टरवर फळबाग लागवड आहे. कृषी व्यवस्थापनामध्ये मृदा आरोग्य हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर पिकांची अनपेक्षित वाढ हा महत्त्वाचा भाग आहे. शेती पिकांच्या आणि फळ पिकांच्या चांगल्या वाढीसाठी तसेच अधिक उत्पादनासाठी खतांचा समतोल आणि कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी माती तपासणी सोबतच वनस्पतीची पाने व उती तपासणी करावी आणि त्यानुसार दिलेल्या शिफारशीनुसार खतांचा वापर करण्यात यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी केले आहे.

      जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेमध्ये नव्याने वनस्पती पाणी व उती तपासणी प्रयोगशाळा स्थापन झालेली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा स्तरावर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वनस्पती पाने व उत्ती तपासणी प्रयोगशाळेतील सेवांचा लाभ घ्यावा.  प्रयोगशाळेचा पत्ता चांद मारी कॉलनी, धानोरा रोड, पालवन चौक बीड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !