राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय यांच्या विद्यमाने

 राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय यांच्या विद्यमाने

स्व. मोहनलाल बियाणी यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर

.परळी / प्रतिनिधी

राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि दै. मराठवाडा साथीचे मुख्यसंपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे दि.19ऑगस्ट शनिवार रोजी आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्वांना या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन देशसेवा व मानवसेवा करण्याची संधी उपलब्ध आहे.

परळीत विशेषतः चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षांपासून दर तीन महिन्यात एकवेळ हे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने दि.19ऑगस्ट शनिवार रोजी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल परळी गंगाखेड रोड येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदान म्हणजे सर्वोच्च दान,त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून, आपली सामाजिक बांधिलकी जपवणूक करावी,असे आवाहन आयोजन समिती द्वारे तसेच शाळेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी केले आहे.

..........





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार