पुस येथील शिवारात बुधवारी मध्यरात्री घडलेली घटना

 शेतकर्‍याचा अल्पवयीन मुलाकडूनच खून

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील शिवारात बुधवारी मध्यरात्री घडलेली घटना


घटनेच्या पाच तासातच बर्दापुर पोलिसांनी लावला प्रकरणाचा छडा


अंबाजोगाई (प्रतिनिधी) - आई वर नेहमी चारित्र्याचा संशय घेत असलेल्या बापाचाच काटा काढण्याचा बेत ठरवलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलानेच बापाच्या डोक्यात कुर्‍हाडीने सपा-सप वार करून त्याचा खून केला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पुस गावा लगत असलेल्या शेतामध्ये बुधवारी रात्री 1.30 वाजता घडली. साहेब जानुखाँ पठाण (वय 42) असे या शेतकर्‍याचे नाव आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील शमिमबी साहेब पठाण (वय 39) यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, फिर्यादी पत्नी वर पती साहेब पठाण हे नेहमी चारित्र्यावर संशय घेत होते. त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे दारू पिवून दररोज पत्नीला व मुला-बाळांवर संशय घेत त्याचं चारित्र हणन करीत होते. दि.16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास मी घरी असताना मोठा मुलगा साहिल याने वडीलांना फोन करून जेवणासाठी विचारले असता त्याने शेतात डब्बा घेवून ये मी येथेच जेवण करणार आहे. आणि सकाळी जनावरांचे दुध घरी घेवून येतो असे सांगितल्यानंतर साहिल याने डब्बा तयार करून छोटा भाऊ तोहित याच्याजवळ पाठविला. व तो पण शेतात झोपणार असल्यामुळे आम्ही सर्व जण घरी झोपलोत त्यानंतर 17/08/2023 रोजी रात्री 1.30 ते 2 च्या सुमारास मुलगा तोहित याने घराचा दरवाजा वाजवून आम्हाला मोठ्याने आवाज दिला मी उठून दरवाजा उघडून काय झाले असे विचारले असता तो घाबरलेल्या अवस्थेत दिसला. त्यावेळी त्याने मला सांगितले की, वडीलांना जेवण घेवून गेल्यानंतर ते दारू पिवून आले होते. मला व तुला चारित्र्यावर संशय घेवून शिविगाळ करू लागले व मला मारहाण केली. त्यावेळी त्यांना मी समजावून सांगितले पण ते ऐकत नव्हते त्यावेळी मला वडील मारू लागल्यामुळे मी तेथे पत्र्याच्या शेडवरील कुर्‍हाड घेवून वडीलांच्या डोक्यात चेहर्‍यावर व मानेवर मारून गंभीर जखम केली असे सांगितले. त्यानंतर माझा मोठा मुलगा साहिल, सोहेल व तोहित असे आम्ही पळत शेतात गेलो असता शेतातील पत्र्याच्या शेडसमोर जखमी अवस्थेत पती पडलेले दिसले. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने मुलगा सोहेल याने वडीलांना आवाज दिला. पण ते उठले नाहीत. आम्ही त्यांना पाहिले असता डाब्या डोळ्यास, कपाळावर, डोक्यात गंभीर जखम होवून रक्तस्त्राव होत होता. ते काहीच बोलत नव्हते. त्यामुळे मोठा मुलगा साहिल याने चुलता अंजुम पठाण यांना फोन लावून सांगितले असता त्यांनी साहेब पठाण यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात रूग्णवाहिकेद्वारे घेवून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरपंचाने बर्दापुर पोलिसांना माहिती देत पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा करून तपासाची चक्रे फिरविली. सकाळी 7 च्या सुमारास चौकशीसाठी बोलवलेल्या चौघांपैकी  एका त्यांच्याच मुलाने खून केल्याची पोलिसांना जवाबात सांगितले. या खूनाची घटना घडल्यानंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. अंबाजोगाईचे अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर बर्दापुर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरविली आणि घटनेच्या पाच तासातच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात बर्दापुर पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास बर्दापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महिंद्रसिंग ठाकुर हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार