प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने व्यासंगी विचारवंत गमावला




पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली


मुंबई । दिनांक ०९।

ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने व्यासंगी विचारवंत आणि साहित्यिक गमावला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. 


   प्रा. नरके यांच्या निधनाचे  वृत्त अत्यंत दुःखद आहे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे ते निष्ठावंत पाईक होते. आपल्या लेखणीने बहुजन समाजाचे प्रबोधन करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यासंगी विचारवंत, साहित्यिक गमावला आहे. नरके कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली  अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार