संत भगवान बाबा विद्यालय सोडून आम्ही कुठेच जाणार नाही, विद्यार्थ्यांचे भावनिक उद्गगार

 संत भगवान बाबा विद्यालय सोडून आम्ही कुठेच जाणार नाही, विद्यार्थ्यांचे भावनिक उद्गगार

शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आणू नका-  फुलचंद कराड

परळी प्रतिनिधी.  श्री संत भगवान बाबा विद्यालयात आमचे आई-वडील शिकले आम्ही सुद्धा याच शाळेत शिक्षण घेत आहोत. त्यामुळे ही शाळा सोडून आम्ही दुसरीकडे कुठेही जाणार नाही आणि शाळेचे स्थलांतरही होऊ देणार नाही असे भावनिक उदगार शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांशी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात आणि शाळेच्या संदर्भात राजकारण आणू नका माझ्याशी राजकारण करा पण मुलांचे वाटोळे करण्याचा प्रयत्न करू नका असे प्रतिपादन केले. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सरसेनापती गहिवरले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांच्या डोळ्यात नकळत पाणी आले.

   ‌ पांगरी येथील श्री संत भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री संत भगवान बाबा विद्यालय आहे. 1991 पासून सुरू झालेली ही शाळा सध्या बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. पांगरी, लिंबूटा, कौठळी, कौडगाव घोडा, नात्रा आधी परिसरातील दहा ते पंधरा गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी या शाळेत मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत.

  परंतु काल काही लोकांनी शाळा पांगरी च्या हद्दीतून बाहेर उठवून लावा अशा प्रकारचे राजकारण करीत रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद कराड यांनी पत्रकारांना प्रत्यक्ष संस्था व शाळेच्या संदर्भात माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर शाळा कुठेही स्थानांतरित होऊ नये अशा प्रकारचे भावना व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांना रडू कोसळले. अशा प्रकारचे निसर्गरम्य, आनंददायी शाळा, उत्कृष्ट शिक्षक वर्ग त्यामुळे आम्हाला शैक्षणिक फायदा होत असल्याचेही विद्यार्थ्यांनी पत्रकारांना सांगितले.

   दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना फुलचंद कराड म्हणाले की, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी शाळा स्थापन करण्यास मोठी मदत केली होती. तसेच संत भगवान बाबा यांच्या नावामुळे शाळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या शाळेला मी एखाद्या मंदिरासारखे पवित्र मानतो. परिसरातील अनेक विद्यार्थिनींना व मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली.  या शाळेला कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होणार नाही व शाळा कुठेही स्थलांतरित होऊ देणार  नाही   अशा प्रकारचे आश्वासन यावेळी फुलचंद कराड यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !