परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

माझा गणेश उत्सव माझा मताधिकार

 माझा गणेश उत्सव माझा मताधिकार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी देखावा सजावट स्पर्धा 2023

    बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-   गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्यांनी भरून जाते. स्वतंत्रपूर्वकाळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरीरीने जपतो आहे. याच प्रयत्नचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेश उत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.

       गणेश उत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करून सामाजिक संदेश देतात. या स्पर्धेत मंडळांनी देखावे व सजावटीद्वारे मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी, मताधिकार, लोकशाहीचे सक्षमीकरण इत्यादी विषयावर प्रबोधन करता येईल. देखावे सजावटीसाठी काही विषय पुढील प्रमाणे दिलेले आहेत.

       लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही, मतदार यादीतला तरुणाईचा टक्का वाढावा म्हणून, आम्ही मतदान करणार कारण, हक्क वंचिताचे मार्ग मताधिकाराचा, शहरी मतदारांची अनास्था- कारणे आणि उपाय.

        वरील विषय सोयीसाठी दिलेले आहेत या विषयापलीकडेही जाऊन आपणास देखाव्यातून संदेश देता येतील. मात्र त्यामध्ये लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार यांचे महत्व अधोरेखित झाले पाहिजे याची काळजी घेण्यात यावी.

         मताधिकार हा 18 वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवाणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नाव वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडणे, मताधिकार बजावताना जात, धर्म,पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधीं निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या- सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल.

       पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डे-मुक्त रस्ते, चांगले शिक्षण, चांगले घर, अशा अनेक सार्वजनिक सुविधा सर्व नागरिकांना विनासायास प्राप्त होणं हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र नागरिकांना या सुविधांची केवळ माहिती असून उपयोग नाही, तर या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधीवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या प्रतिनिधींची निवड करणंही तितकंच आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपला मताधिकार बजावला पाहिजे आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या अमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्रधान्य दिले पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळे लोकप्रतिनिधीवर दवा निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यासारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येतील.

       स्पर्धेचा गुगल अर्ज आणि काही तांत्रिक नियमावली सप्टेंबरमध्ये पाठवण्यात येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी बक्षिसाचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 51 हजार रुपये, तृतीय क्रमांक २१ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ 10 हजार रुपयाची असे एकूण 10 बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धकांच्या संख्येनुसार आणि दर्जानुसार बक्षिसांच्या संख्येत आणि रकमेत बदल करण्याचा अधिकार आयोजकांनी परीक्षकाचा राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!