परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

परमरस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळा

 श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह उत्साहात

बीड दि०९ (प्रतिनिधी)

                श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन ३ जुलै गुरुपौर्णिमा ते सोमवार (ता.०७) आँगस्ट पर्यंत करण्यात आले होते या सोहळ्यास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

             स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ४९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अखंडपणे हे ५० वे वर्षे होते. ३ जुलै गुरुपौर्णिमेला श्री.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते कलशपुजन करुन चातुर्मास सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सप्ताहात पहाटे शिवपाठ, मन्मस्वामी यांची महापूजा, रुद्रपठण, गाथा भजन, प्रवचन, किर्तन, शिवजागर, महाप्रसाद आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान ३५ दिवस विविध मान्यवर महाराजांच्या किर्तनांचे त्याचबरोबर रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी रविवारी (ता.०६) सकाळी निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांचे कीर्तन दुपारी राजलिंग शिवाचार्य महाराज बार्शी यांचे टाळ आरती किर्तन संपन्न झाले. संध्याकाळी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.मन्मथस्वामी मंदिर दिपोत्सवामुळे उजळून निघाले. दरम्यान या सर्व कार्यक्रमास महाराष्ट्रातील वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. चातुर्मास सप्ताहाचे हे ५० वे सुवर्णमहोत्सवी वर्षे असल्याने सप्ताहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काशीपीठाचे जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनीही या सोहळ्यास उपस्थिती लावली. भक्तांसाठी आर्शिवचन दिले. शेवटच्या दिवशी प्रासादिक किर्तन दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचे संपन्न झाले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पंचकमेटी सदस्य सोमनाथअप्पा  हालगे, शिवाअण्णा भुरे आदी उपस्थित होते. यामध्ये ज्ञानयज्ञ सोहळ्यास आजपर्यंत सहकार्य करत असलेले अन्नदाते, किर्तनकार, प्रवचनकार व मान्यवरांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार आयोजकाच्या वतीने करण्यात आला. यावर्षी आदिकमास असल्याने भाविक भक्त़ाची सप्ताहात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!