पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दिव्य दर्शन

 दुसरा श्रावण सोमवार :परळी वैजनाथ मंदिरात मनमोहक पुष्पसजावट;दर्शनार्थी भाविकांची गर्दी







परळी वैजनाथ,  वृत्तसेवा.....

       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आज दुसर्‍या श्रावण सोमवारी परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.आज दुसरा श्रावण सोमवार असल्याने गेेल्या सोमवारपेक्षा भाविकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे.परळी वैजनाथ मंदिरात मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली आहे.

       हर हर महादेवचा जयघोष करत परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे.  श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. श्रावणीच्या पर्वकाळात परळीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सोमवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. 

• धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानकडून सजावट
        श्रावण सोमवारच्या निमित्ताने कृषीमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण वैद्यनाथ मंदिर विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे 21 प्रकारातील फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात; त्यामुळे गेल्यावर्षीपासून पवित्र श्रावण महिन्यात प्रत्येक श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीला याच पद्धतीने नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात येते.
• भाविकांसाठी दरसोमवारी उपवास फराळ वाटप
      दरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांसाठी श्रावण महिन्यानिमित्त दरसोमवारी उपवास फराळ वाटप  करण्यात येत आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार