चळवळीतील कृतीशील विचारवंताला आपण मुकलोत-अनंत इंगळे 



परळी(प्रतिनिधी)फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कृतीशील व अभ्यासु विचारवंताला देश मुकला आहे असे भावनिक उदगार सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे खंड, महात्मा जोतीराव फुलेंचं समग्र वाड्मय यावर ऐतिहासिक असं काम प्रा. हरी नरके सरांनी केलं आहे.ओबीसी जणगणना, ओबीसी जनजागरण यावर आपल्या लेखणीतून व कृतीतून अनेक प्रेरणादायी व चळवळीला प्रेरणा देणारं साहित्य त्यांनी लिहिलं  आहे. 

   समाजाला आताच्या काळात गरज असणारे एक एक  माणसं जात आहेत.विश्वास बसणार नाही अशा मृत्यूंना, धक्कादायक म्हणतांना या माणसांनी केलेले रचनात्मक काम इतके उभारले की, त्यांच्या जाण्यामुळे आता एक पोकळी निर्माण झाली आहे ही जाणीव आपल्याला दुःखदायक  आहे. हरी नरके सर अविरतपणे महात्मा फुलेंना समाजात उपस्थित करत राहिले आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे उद्धारक कसे असतात हे मांडत राहिले. त्यांचे विचार व साहित्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार