कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

 परळी तालुका अवर्षणग्रस्त: शेतकऱ्यांना २५ % विमा अग्रिम मिळणारच!


कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

परळी वैजनाथ , प्रतिनिधी
          गेल्या महिनाभरापासून परळी तालुक्यात पाऊस आलेलाच नसल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळजवळ खरीप हंगाम हा उध्वस्त झाल्यात जमा आहे. त्यामुळे विम्याच्या निकषानुसार 25% विमा आग्रीम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बंधनकारकच आहे. त्याबरोबरच कृषी विभागाच्या क्षेत्रीय पाहणीचा अहवाल हीच परिस्थिती दाखवतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या बदल्यात 25 टक्के विमा अग्रीम मिळणारच हे आता निश्चित आहे.
          परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने  अवर्षणग्रस्त तालुका म्हणून प्रशासनानेही नोंद घेतलेली आहे.शासनास अहवाल पाठवून व पीक विम्याची अग्रीम मंजुर करण्याबाबत शिफारस कृषी कार्यालयाने पाठवलेल्या आहवालात करण्यात आलेली आहे. कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान  झाल्याचा कृषी विभागाचा आहवाल आहे. परळी तालुक्यातील मंडळनिहाय क्षेत्र पाहणीचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवला असून या अहवालात मंडळी पाहणी व नुकसानीचा आढावा सादर करण्यात आलेला आहे. परळी तालुक्यातील परळी वैजनाथ, धर्मापुरी, नागपूर, मोहा ,सिरसाळा व पिंपळगाव गाढे या सहा मंडळातील नुकसानीची पाहणी व पीक परिस्थिती याचा अहवाल प्रशासनाने तयार केला असून हा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालात मंडळनिहाय  नुकसानीची टक्केवारी व पिकनिहाय नुकसान दाखवण्यात आले असून जवळपास सर्वच मंडळांमध्ये कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान  झाल्याचा कृषी विभागाचा आहवाल आहे. त्याचप्रमाणे हा अहवाल सादर करताना क्षेत्रीय पाहणी चा निष्कर्ष म्हणून तालुका कृषी कार्यालयाने हे नुकसान पाहता व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता विम्याचे 25% अग्रीम देण्याची शिफारस केलेली आहे.


      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार