परळीत येत परभणी पोलिसांनी धडक कारवाई

परभणी जिल्ह्यात गुटखा पुरवठा करणाऱ्या परळीतील गुटखा व्यापाऱ्यावर सोनपेठ पोलिसांची कारवाई



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
          परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा पुरवठा करणारा परळीतील व्यापारी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोनपेठ पोलिसांनी परळीत येऊन परळीच्या या गुटखा माफियावर कारवाई केली आहे. गुटख्याच्या अवैध धंद्याचे मोठे केंद्र परळीतून सुरू असल्याचे या माध्यमातून पुढे आले आहे.
      याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दि.१०|८|२०२३रोजी सायं. ६.४९ वा. सोनपेठ पोलिसांनी नैकोटा येथील एका किराणा दुकानावर कारवाई करत या ठिकाणाहून आरोपीसह अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या गुटखा पकडला याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून माहिती घेतली असता या गुटख्याचा पुरवठादार परळी येथील लाहोटी नावाचा व्यापारी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सोनपेठ पोलिसांनी परळी येथे येत या व्यापाऱ्यावर कारवाई केली आहे.या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्याचे  एएसआय विनोद किशनराव कुलकर्णी यांनी फिर्याद दाखल केली असुन दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नैकोटा येथील किराणा  दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व आरोग्याच्या दृष्टीने बंदी घालण्यात आलेला सुगंधित तंबाखू गुटखा व राजनिवास सुगंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू व एक हजार गोवा कंपनीचा गुटखा असा एकूण सहा हजार सहाशे रुपयाचा माल ताब्यात बाळगून आला म्हणून गुन्हा दाखल आहे.
      या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून माहिती घेतली असता या गुटक्याचा पुरवठा पुरवठादार परळी येथील लाहोटी नावाचा व्यापारी असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर सोनपेठ पोलीसांनी परळीत येउन या व्यापाऱ्याचा शोध घेतला असता घर झडती मध्ये 48 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच या आरोपीलाही अटक केली आहे.अधिक तपास सोनपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि म्हात्रे हे करत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार