इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - राजेश कौलवार

       आर्य वैश्य मंगल कार्यालय परळी वैद्यनाथ येथे  दि. ०२/०७/२०२२ रोजी आर्य वैश्य समाज परळी वैद्यनाथ व स्व. वंदना नागनाथ पारसेवार प्रतिष्ठान च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त ह.भ.प. माऊली महाराज रुमणेकर यांच्या रसाळ वाणीतुन गाथा पारायणाची काल सांगता झाली. या कार्यक्रमात आर्य वैश्य समाजातील इयत्ता १० व १२ च्या ८०% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी गुणवंत ठरविण्यात आले.तसेच १० वर्गात परळी आर्य वैश्य समाजात ९६.६०% गुण घेऊन कु. स्वाती राजेश्वर गडगुळ ही प्रथम तर अभिषेक अमोल रुद्रवार हे ९१.६०% गुण प्राप्त करुन द्वितीय आले तर १२ वर्गात वरद प्रकाश चिद्रेवार हा ८३.६७ तर वेदांती अनिल बोतकुलवार ही ८३% गुण संपादन करुन द्वितीय* *आली तसेच ७ विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन पर  सत्कार करण्यात आला. या सर्वांचा रुमणेकर महाराज व ईतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      या प्रसंगी विकासदादा डुबे , नागनाथ पारसेवार, सतीश चौलवार, रमेश कोमावार,  सुरेश गडम, रामकिशन देवषटवार,  श्रीनीवास रुद्रवार, जीवन गडगुळ, सुनील गडम, प्रभाकर अय्या, सुधाकर वांकर, दिक्कतवार, गोविंद डुबे, योगेश मुक्कावार,  व्यंकट मालेवार, वैभव झरकर व महीला वर्ग फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !