आ. रोहीत पवार यांची प्रमुख उपस्थिती

 14 ऑगस्टला अंबाजोगाई येथे युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली


आ. रोहीत पवार यांची प्रमुख उपस्थिती


       मागील 15 पर्षापासून नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवार्षी युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत होण्यासाठी युवा स्वातंत्र्य ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही ही रॅली अंबाजोगाईत सोमवार दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 05:30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक - तानाजी मालुसरे चौक - पाटील चौक - योगेश्वरी देवी मंदीर - शिवाजी चौक ते वेणुताई चव्हाण कन्या प्रशाला काढण्यात येणार आहे. अंबाजोगाईकरांनी युवा स्वातंत्र्य ज्योत रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर चे सचिव डॉ.नरेंद्र काळे यांनी केले आहे. 

युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली आयोजनाचे हे यंदाचे सोळावे वर्ष आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला दरवर्षी राज्यात 25 शहरात ही रॅली काढण्यात येते. यंदा या रॅलीत युवा आमदार श्री. रोहीत (दादा) पवार सहभागी होणार आहेत. रॅली नंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक पठन करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप होईल. अंबाजोगाई व परीसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर चे अध्यक्ष श्री.अनिकेत लोहिया, उपाध्यक्ष श्री.दगडुदादा लोमटे, सचिव डॉ.नरेंद्र काळे, कोषाध्यक्ष श्री.अभिजित जोंधळे, माजी आ.उषाताई दराडे, मा. आ. पृथ्वीराज साठे, श्री.अमर हबीब, श्री.अतुल कुलकर्णी, सौ.सृष्टी सोनवणे, प्रा.अखिला गौस, सौ.कावेरी नागरगोजे, प्रा.सुरेश पाटील, आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार