सिने नाट्य कलावंत संघटनेचे मागणी

 राज्य नाट्य स्पर्धेतील ती अट रद्द करा- सिने नाट्य कलावंत संघटनेचे मागणी




परळी प्रतिनिधी.  महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका व नियमावली मधील नियम क्रमांक 5 (इ ) व 4 सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घातलेली ती अट रद्द करण्याची मागणी परळी सिने नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत परळी उप जिल्हाधिकारी व तहसीलदार जी.आर.येद्देवाड यांना  निवेदन देण्यात आले आहे.

    या निवेदनात पुढे म्हटले आहे की राज्य नाट्य स्पर्धेसाठी सहभागी होणारे संघ प्रतिज्ञापत्र व नाटकाची संहिता जमा करीत असतात. तसेच कोणताही नाट्य लेखक प्रयोग रंगभूमी निरीक्षण मंडळाकडून संहिता सेंन्सार करून घेत असतात. तेच नाटक पुन्हा स्पर्धेमध्ये विविध संघाकडून सादर होत असते.

   दरम्यान नाट्य प्रयोग सादर होत असताना एखाद्या नाटकातील कोणताही भाग अचानक वगळण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य संचनालयाचे नियमावलीत नमूद करण्यात आलेले आहे. हा नाटककार व कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा नियम आहे. तो नियम तत्काळ रद्द करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

‌. सदर निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भोकरे, उपाध्यक्ष रानबा गायकवाड, सचिव प्रा. डॉ.  सिद्धार्थ तायडे, कलावंत सर्वश्री विठ्ठलराव झिलमेवाड, वैजनाथ कळसकर, भगवान साकसमुद्रे, अनंत सोळंके, सागर हनवते, बा. सो.कांबळे, सिद्धेश्वर इंगोले, विकास वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार