पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

 डोक्यात दगड घालून पत्नीचा खून:पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

गेवराई.....


चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केल्याची घटना आज पहाटे गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील परिसरात घडली. पत्नीच्या डोक्यात दगड घातल्यानंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि मी पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याचे पोलीसांना सांगितले. या प्रकरणात पोलीसांनी स्वतः फिर्याद दिली असुन पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की 

औरंगाबाद जिल्ह्यातील आखदवाडा (ता. पैठण) येथील समीर कादर शेख (वय ३५) हा पत्नी, दोन वर्षाची मुलगी व स्वतःच्या बहिणीसह चकलांबा (ता. गेवराई) येथे काही कामानिमित्त 

 काल दि. २४ ऑगस्टरोजी आले होते काल रात्री हे कुटूंब  झोपले असता. या दरम्यान शरामद उर्फ समीर शेख याने झोपेत असलेल्या पत्नी शबाना शेख (वय २७) हिच्या डोक्यात दगड घातला. आवाज ऐकुन सोबतची बहिण व अन्य लोक जागे झाले. समीर शेख याने बहिणीच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पत्नी शबानाला जवळच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होवून समीर शेख याने मी पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगितले. मला तिच्या चारित्र्यावर संशय होता. म्हणून मी हे कृत्य केल्याचे त्याने पोलीसांना सांगितले. त्यानंतर पोलीसांनी खाजगी रुग्णालयात जाऊन शबाना हिस तात्काळ चकलांबा सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी बीडला घेवून जाण्यास सांगितले. त्यानुसार जखमी शबाना हिस बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता आज पहाटे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मयत घोषित केले. या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्याचे पोउपनि अनंता तांगडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शरामद उर्फ समीर कादर शेख याच्याविरूध्द चकलांबा पोलीस ठाण्यात कलम ३०२ भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि  एकशिंगे करत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !