भरत गित्ते यांची राज्यपालांकडून नियुक्ती

तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळावर परळीच्या भरत गित्ते  यांची राज्यपालांकडून नियुक्ती



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे (सीओईपी )तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळावर 'राज्यपाल नामनिर्देशित सदस्य' म्हणुन परळी तालुक्यातील नंदागौळ येथील भूमिपुत्र व पुणे येथील उद्योजक  ,तौराल इंडिया कंपनीचे सीईओ भरत केशवराव गित्ते यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.  भरत गीते यांच्या नियुक्तीमुळे परळी तालुक्याच्या शिरपेचात  मानाचा तुरा रोवला गेला आहे                                               जुलै १८५४ मध्ये स्थापन झालेल्या जगविख्यात असलेल्या व भारत देशाचा प्रथम अभियंता जिथे नावारूपास आलेल्या व शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सीओईपी महाविद्यालयाचे आता  सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये रूपांतर झाले आहे.


नुकत्याच सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या  झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत राज्यपालांनी निवड केलेल्या काही सदस्यांची नियुक्ती झाली आहे त्यामध्ये सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी मंडळाचे  अध्यक्ष श्री. भरत गीते (एम.डी तथा सी. ई.ओ;तौराल इंडिया, पुणे)

जे माजी विद्यार्थी मंडळाचा कार्यभार अगदी चोख व सक्षमपणे सांभाळत ज्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. रमेशजी बैस यांनी घेतली.

श्री. गीते यांनी गेल्या३वर्षात संस्थेच्या प्रगतीत अभुतपुर्व योगदान दिले आहे.

व त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल यांनी श्री. गीते यांची सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळावर 'राज्यपाल नामनिर्देशित सदस्य' म्हणुन पुढील ५ वर्षकरिता नियुक्ती केली आहे.

.


भरत गित्ते यांचे  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परळी व लातूर येथे झाले त्यानंतर सीओइपी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले ,यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना पुरस्कारही मिळाला आहे  सीओ ईपी च्या  माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्षपद ही यशस्वीपणे सांभाळले आता विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले आहे,भरत गित्ते हे परळी चे रामराव गित्ते व रवींद्र गित्ते यांचे बंधू आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !