परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
शरद पवारांच्या बीड मधील सभेनंतरही धनंजय मुंडेंकडे मात्र इनकमिंग!
परळीचे माजी नगराध्यक्ष सुनील नाना फड यांचा अजितदादा, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
मुंबई (दि. 17) - आज एकीकडे बीड शहरामध्ये धनंजय मुंडे यांना टारगेट करत शरद पवारांची जाहीर सभा संपन्न झाली मात्र अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरूच आहे.
आज परळीचे माजी नगराध्यक्ष सुनील नाना फड यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
दरम्यान सुनील नाना फड यांचे अजितदादा पवार यांच्या सह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षात स्वागत केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा