इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

कौशल्य विकास कार्यशाळा

 लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयान गृहविज्ञान विभागातर्फे कौशल्य विकास कार्यशाळा: मोठा प्रतिसाद 


परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)

'नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना त्या अनुषंगाने " कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन गृहविज्ञान विभागातर्फे नुकतेच करण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रमुख पाहुणे संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे उपस्थित होत्या. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कपील वाघमारे उपस्थित होते. श्री वाघमारे यांनी चॉकलेटचे विविध प्रकार विद्यार्थिनींना शिकवले. या कौशल्याचा उपयोग व्यवसाय म्हणून कसा करावा यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. पाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका छाया देशमुख,प्रा. जोशी, प्रा. यल्लावाड, कल्याणी पत्की उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनीच उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या