तयारी स्वातंत्र्य दिनाची :हर घर तिरंगा अभियान

 Independence Day | Buy flag online post office : राष्ट्रध्वज मिळणार घरपोच; पोस्टाची सुविधा


          येणारा १५ ऑगस्ट हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियना २.० सुरू केले आहे. या अंतर्गत देशभरात पोस्टाकडून राष्ट्रध्वजाची विक्री करण्यात येणार आहे. शिवाय पोस्ट खात्याकडून राष्ट्रध्वजाची ऑनलाईन विक्री ही केली जाणार आहे. ऑनलाईन ध्वजाची मागणी केल्यानंतर ध्वज घरपोच मिळणार आहे. (Buy flag online post office)

एका ध्वजाची किंमत २५ रुपये असून डिलिव्हरीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तर १ लाख ६० हजार पोस्ट कार्यालयांत ध्वजांची विक्री ऑफलाईन पद्धतीनेही होणार आहे.

केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधित हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त प्रत्येक नागरिकांने आपल्या घरी राष्ट्रध्वज लावावा असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

पोस्टातून राष्ट्रध्वज ऑनलाईन मागवण्याची प्रक्रिया

1. पोस्ट खात्याच्या

https://www.indiapost.gov.in/ या

वेबसाईटवर जा. तेथून E Post ऑफिसवर जा. २. इ पोस्ट ऑफिसच्या पेजवर प्रॉडक्टमध्ये जा. तेथे नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया वर जा. किंवा थेट या लिंकवर क्लिक करू शकता.

३. नॅशनल फ्लॅग कार्टमध्ये जमा करा. ४. तेथून बाय नाऊचा पर्याय निवडा आणि तेथून पेमेंट करा.

राष्ट्रध्वज किती रुपयांना मिळतो? Buy flag online post office

नाममात्र २५ रुपयांत राष्ट्रध्वज पोस्टातून उपलब्ध

करून देण्यात आला आहे. यावर कोणताही जीएसटी आकारण्यात येणार नाही. ऑनलाईन खरेदी करताना पत्ता द्यावा लागेल. तसेच एका व्यक्तीला ५ ध्वज मिळू शकतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !