आंदोलन : मागण्या: सहभागी व्हा :आवाहन

 बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचा 9 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा





परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

 बीड जिल्हा सिटूच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे यांनी दिली आहे.

       ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी मागील वर्षी 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याची ग्रामसेवकांना लेखी सूचना द्या, ग्रामीण भागातील बांधकाम कामगाराचे अटल घरकुल बांधकाम योजनेचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करा, शहरातील बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना सुरू करा, साठ वर्षावरील बांधकाम कामगारांना पेन्शन द्या, बांधकाम कामगारांचे योजनेअंतर्गत लाभाचे अर्ज एक महिन्यात मंजूर करून खात्यात रक्कम जमा करा, बोगस आरोग्य तपासणी योजना बंद करून मेडिक्लेम योजना सुरू करा, माध्यान्ह भोजनासाठी प्रत्येक कामगारांना खात्यावर दोन हजार रुपये जमा करा, दरवर्षी बांधकाम कामगारांना बोनस द्या इत्यादी प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स पासून दुपारी बारा वाजता निघून बस स्टँड मार्गे जिल्हा परिषदेवर पोहोचेल. मोर्चात फार मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे, उपाध्यक्ष ओम पुरी, संजय जाधव, सरचिटणीस जालिंदर गिरी, सुभाष डाके, मनोज देशमुख, शेख जावेद, प्रकाश वाघमारे, बाबासाहेब रोडे, चांद पाशा, शेख रफिक, मुंजा तळेकर, यासीन शेख, साईबाबा कांबळे, सुरेश शर्मा, राजकुमार हनवते, उर्मिला कोकाटे आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !