महिला महाविद्यालयात आचार्य सानंदजी शास्त्री यांचे प्रतिपादन

 भारतीय संस्कृतीत  महिलांना ब्रम्हाचा दर्जा



महिला महाविद्यालयात आचार्य सानंदजी शास्त्री यांचे प्रतिपादन


परळी वार्ताहर

 दिनांक 26 .8 . 2023


                संस्कृत दिनानिमित्त कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आयोजन केलेल्या विशेष व्याख्यान सत्रात आचार्य सानंदजी शास्त्री यांनी 'संस्कृत साहित्यातील महिलांचे स्थान' या विषयावर बोलताना वेदांनी महिलांना ब्रम्हाचा दर्जा दिलेला आहे असे प्रतिपादन केले.यासंदर्भात त्यांनी 'स्त्री हि ब्रम्हा बभूविथ'असे ऋग्वेदाचे वचन उद्धृत केले. महिलांच्या उन्नती विषयक विचारांची पेरणी त्यांनी या व्याख्यानातून केली.

नास्ति वेदात् परं शास्त्रं नास्ति मातुः परो गुरुः । अर्थात्

वेदापेक्षा श्रेष्ठ शास्त्र नाही आणि आईपेक्षा श्रेष्ठ गुरु नाही ,असे प्रतिपादन त्यांनी केले. या व्याख्यानातून संस्कृत साहित्यात महिलेला दिलेल्या श्रेष्ठ आणि सन्माननीय स्थानाचे प्रभावी विवेचन त्यांनी केले.

       समारोहात प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले.पाहुण्यांच्या परिचयानंतर प्रास्ताविकात महिला महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या कार्याचा आलेख मांडण्यात आला. त्यानंतर कु. रूपाली साखरे हिने याप्रसंगी संस्कृतमधून अस्खलितपणे भाषण प्रस्तुत केले. तत्पश्चात् कु. सायली चाटोरीकर आणि कु. मधुरा पाटणकर यांनी तोंडपाठ केलेल्या पाणिनी विरचित अष्टाध्यायीची सूत्रे , महर्षी पतंजली विरचित योगसूत्रे , भगवद्गीतेचे श्लोक यांचे सादरीकरण केले.

                 संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद जी देशमुख यांनी प्राचार्यांच्या वतीने अध्यक्षीय समारोप करताना संस्कृत विभागाच्या सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले. त्यानंतर संस्कृत भाषेच्या महतीबद्दल सांगताना ते पुढे म्हणाले की संस्कृत भाषा ही ज्ञानभाषा आहे. साधारण तीन हजार वर्षांपूर्वी संस्कृत ही बोलचालीची भाषा होती. संस्कृत भाषा ही वैज्ञानिक भाषा म्हणूनही ओळखली जाते ,असे त्यांनी सांगितले.अनेक स्थित्यंतरानंतर इतर भाषा उदयाला आल्या. अशा  प्रकारे अनेक  दाखल्यानिशी आपल्या वक्तव्यातून त्यांनी संस्कृतचे महत्त्व स्पष्ट केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे यांनी भाषण व श्लोक सादरीकरण केलेल्या विद्यार्थिनींचे मुक्तकंठाने कौतुक केले व या समारोहाला शुभेच्छा दिल्या.

           या कार्यक्रमासाठी आर्य समाज परळीचे उपप्रधान श्री लक्ष्मणराव आर्य गुरुजी आर्य समाजाचे श्री रंगनाथ तिवार हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांनी केले.संस्कृत विभागाच्या प्रा. वीणा भांगे यांनी संस्कृतमधून सुंदर रीतीने सूत्रसंचालन केले तर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर.के. यल्लावाड यांनी आभार मानले.या समारोहाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रस्तुत कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !