खळबळजनक: परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील हॉटेलवर अज्ञात इसमांनी केला गोळीबार


परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....

      परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील एका हॉटेलवर वाद घालत व मॅनेजरला मारहाण करून अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,  परळी ते अंबाजोगाई रोडवर कन्हेरवाडी शिवारात हॉटेल यशराज येथे दि. 09/08/2023 रोजी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार आरोपी यांनी फिर्यादी हाॅटेल चालक विलास भिमराव आघाव व हॉटेलवरिल मॅनेजर नरेश निसाद यास सिगारेटचे पाकीट मागीतले. मॅनेजर नरेश निसाद याने सिगारेट पाकिटाचे 150 रु मागीतले असता यातील आरोपींनी संगणमत करुन  मँनेजर नरेश निसाद याच्या कॉलरला धरुन चापटा चबुक्याने मारहाण केली. शिवीगाळ करुन ग्लास, बतई फेकुन मारून आरोपींनी मॅनेजर नरेश निसाद याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचेकडिल पिस्तुलने फायरींग करुन तिन गोळ्या झाडल्या. याप्रकरणी हाॅटेल चालक विलास भिमराव आघाव यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.- 241/2023 कलम 307,323,504, 506.34, मादवी सह कलम 3/25, 27 भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि गित्ते हे करत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार