परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पंकजा मुंडे,खा डॉ प्रितम मुंडेंनी दूरध्वनीवरून सन्मानार्थीचे केले अभिनंदन

 प्रा.एच.पी.गित्ते यांनी समाजसेवेची दिलेली शिदोरी गित्ते परिवाराने जतन केली  -हभप केशव महाराज उखळीकर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)वै प्रा एच पी गित्ते सर यांच्या १२व्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित सन्मान कर्तृत्वाचा विशेष कार्य गौरव पुरस्कार २०२३ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

भागवताचार्य जोग शिक्षण संस्था आळंदी मा.  अध्यक्ष केशव महाराज उखळीकर यांच्या शुभहस्ते आणि परळी वैजनाथ मार्केट कमिटी मा सभापती बंकटराव कांदे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा संपन्न झाला.

भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा  मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रितम मुंडे या काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमासाठी उपस्थित राहु शकल्या नाहीत त्यांनी दुरध्वनी द्वारे सन्मान प्राप्त सन्मानार्थी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि वै प्रा एच पी गित्ते सर यांना त्यांच्या पुण्यस्मरणा निमित्त आदरांजली अर्पण केली.

हरिसुख प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेश गित्ते आपल्या वडीलांच्या पुण्यस्मरणात जो समाजोपयोगी उपक्रम राबवतात त्या बद्दल त्यांचे कौतुक केले आणि भविष्यात ही गित्ते परिवाराच्या हातुन समाजसेवेचा वसा आसाच अहोरात्र सुरू राहो या सदिच्छा दिल्या.

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर डॉ सतीश गुट्टे (संचालक समर्थ होस्पीटल),  बाबुराव रुपनर (नायब तहसीलदार, परळी वैजनाथ),प्रा डॉ रमेश राठोड (प्राचार्य वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ),सलिम चाऊस(पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन परळी वैजनाथ) सतीश बियाणी(संपादक, दैनिक मराठवाडा साथी),संजय खाकरे (दैनिक लोकमत, प्रतिनिधी),अॕड.ह भ प दत्तात्रय आंधळे (संतवआड मयाचे गाडे अभ्यासक), प्रकाश सुर्यकर (संपादक, दैनिक दिव्यअग्नि) डॉ अमोल चाटे (वैद्यकीय अधिकारी),मोहन व्हावळे संपादक संघर्षनेता,पीसीएन न्युज) श्रीकृष्ण मोती (संचालक आविष्कार मेन्स शेअर) यांना सन्मान कर्तृत्वाचा विशेष कार्य गौरव पुरस्कार २०२३ ज्यात स्मृती चिन्ह, ओम नमः शिवाय चा गमजा, तुळशी वृंदावन देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सतीश मुंडे, सुरेश माने ,प्रदिप कुलकर्णी, मारोतराव फड, वैजनाथ सानप (सर),इंदुमतीताई गिते,रवी कांदे सर,सुंदर मुंडे, अनिल गुट्टे, चंद्रकांत देवकते, तानाजी व्हावळे, पप्पू चव्हाण, धुराजी साबळे, रामेश्वर महाराज इंगळे, रमेश गिते, संजय गिते, किशोर गिते, राजेश साबणे, फुलचंद गिते, माऊली तांबडे,ह भ प जगदीश महाराज सोनवणे,प्रा रविकांत कराड, गणेश होळंबे, आदि उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत ओम नमः शिवाय चा गमजा देऊन हरि सुख प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेश गिगित्तेां नी केले.

याच सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेचदेशसेवा करून भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेले भारतीय सैनिक बेलंबा गावचे सुपुत्र महादेव बाबुराव गित्ते बंडु देवीदास लांडगे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात आपले विचार मांडताना केशव महाराज उखळीकर यांनी प्रा एच पी गित्ते यांनी जी समाजसेवेची शिकवण आपल्या मुलांना दिली आणि त्यांच्या मुलं ती जतन करून हा वसा पुढे चालवत आहेत याची आज समाजाला गरज आहे.समाजेसेवेचा वसा प्रत्येक परिवाराने कसा जतन करावा हे गित्ते परिवाराने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.गित्ते परिवाराचे समाजोपयोगी उपक्रम आदर्श घेण्याजोगे आहेत असे भावोदगार केशव महाराज उखळीकर यांनी केले.

सन्मानार्थी संजय खाकरे,सलीम चाऊस सर,ह भ प दत्तात्रय आंधळे,प्रा डॉ रमेश राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा एच पी गित्ते सर यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि गित्ते परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.या सोहळ्यास पंचक्रोशीतील लोक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन हरि सुख प्रतिष्ठान चे संचालक प्रा अजय गित्ते यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!