परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने स्वागत

 २६८ किमी विकाराबाद- परळी लोहमार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी



परळी वैजनाथ:  रेल्वे प्रशासनाने नुकत्याच काढलेल्या पत्रकानुसार विकाराबाद-परळी या २६७.७७ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण मागणीला फायनल लोकेशन सर्वेक्षणसाठी दिल्ली बोर्डाने मान्यता दिली आहे.

विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. हैदराबाद ते मनमाड, हैदराबाद ते नांदेड यासह अनेक ठिकाणे जोडणारा हा सुलभ मार्ग आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मंजुरीबद्दल परिसरातून आभार व्यक्त होत आहेत.

          विकाराबाद ते परळी मार्गावर धावणाऱ्या गाड्या...

हैदराबाद- औरंगाबाद, हैदराबाद- पूर्णा, काकीनाडा- शिर्डी, विजयवाडा- शिर्डी, सिकंदराबाद- शिर्डी, तिरुपती- शिर्डी, रेनिगुंटा- औरंगाबाद, नांदेड- बंगळुरू याशिवाय मालगाडी या लोहमार्गावरून धावते. विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. हैदराबाद ते मनमाड, हैदराबाद ते नांदेड यासह अनेक ठिकाणे जोडणारा हा सुलभ मार्ग आहे.



परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने स्वागत


      रेल्वे प्रशासनाने नुकत्याच काढलेल्या पत्रकानुसार परळी-विकाराबाद या २६७.७७ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण फायनल लोकेशन सर्वेक्षणसाठी दिल्ली बोर्डाने मान्यता दिली आहे. परळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी रेल्वे प्रशासनाचे स्वागत केले आहे.रेल्वे विकासात ही मंजुरी महत्त्वपूर्ण आहे .परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने समितीच्या स्थापनेपासून भविष्यात परळी रेल्वे स्थानकास महत्व असणार आहे. याबद्दल रेल्वे प्रशासनाचे रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व सचिव जी एस सौंदळे यांनी स्वागत केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार