रेल्वे संघर्ष समिती

 परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट करून उच्च दर्जाच्या अधिकाधिक रेलसेवा देऊ - भरतेश कुमार जैन    




    

   परळी वैजनाथ  दी .  {प्रतिनिधी}.....    मध्य रेल्वे झोन अंतर्गत सिकंदराबाद चे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर - डीआरएम) भरतेश कुमार जैन हे गुरुवारी सकाळी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर विशेष निरिक्षण दौर्यानिमित्त आले होते. "परळी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची  सदिच्छा भेट घेऊन त्यांना आपल्या काही विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. त्या मागण्या बाबतीत त्यांना चर्चेद्वारे योग्य ती जाणीव करून दिली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या वेळी बोलताना डीआरएम श्री जैन यांनी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट करून येथे प्रवाशांना अद्ययावत आणि उच्च दर्जाच्या रेल्वे सेवा देण्याचे निःसंदिग्ध आश्वासन या शिष्टमंडळास दिले. रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री चंदुलाल बियाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

 नांदेड - पनवेल, निजामाबाद - पंढरपूर व इतर गाड्यांचे स्लीपर कोठे आणि जनरल कोचेस वाढवावेत ; १७६१४/१३ नांदेड पनवेल गाडी पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला पर्यंत तर १२७४९/५०  मछलीपट्टणम बीदर;१७०१०/०९ हैद्राबाद बीदर इंटरसिटी ; १६५७१/७२ यशवंतपूर बीदर ; १७६६३/६३ तांडूर परभणी एक्स्प्रेस इत्यादी गाड्या परळी वैजनाथ पर्यंत विस्तारित कराव्यात ; शिवाय ५१५२६/२५ मिरज परळी वैजनाथ पुढे परभणी जंक्शन पर्यन्त तर ५७५२२/२१ पूर्णा परळी वैजनाथ गाडी पुढे बीदर किंवा कुर्डुवाडी जंक्शन पर्यन्त करावी 

तसेच परळी वैजनाथ शहराच्या पूर्वेला टाकण्यात येणाऱ्या नियोजित बायपास लाईन तथा काॅर्ड लाईन वर नवीन अत्याधुनिक रेल्वे स्थानक त्वरित बांधण्यात यावे ; विकाराबाद जंक्शन ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाबरोबरच परभणी जंक्शन ते परळी वैजनाथ आणि लातूर रोड जंक्शन ते कुर्डुवाडी जंक्शन   रेल्वे स्थानकापर्यंतच्या रेल्वे मार्गांचे देखील दुहेरीकरण करण्यात यावे;परळी वैजनाथ स्थानकाच्या दोन्ही प्लॅटफॉर्म वर स्वयंचलित सरकते जिने - एस्कलेटर बसवावेत ; येथील रेल्वे स्थानक परिसरात "सुलभा इंटरनॅशनल" च्या धर्तीवर स्नानगृह व स्वच्छता गृह बांधावेत ; आरक्षण कक्षाची कामाची वेळ सध्याच्या आठ तासांहून अधिक म्हणजे किमान सलग बारा तास तरी करावी ;

 यावेळी निवेदन देताना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलालजी  बियाणी, संजय  आघाव, जी एस सौंदळे ,सत्यनारायण दुबे, हिरालाल बोरा,  आत्मलिंग शेटे, आश्विन मोगरकर,  प्रकाश चव्हाण, ओमप्रकाश बुरांडे, प्रकाश वर्मा, शरद कावरे यासह आदींची उपस्थिती होती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार