आर्ट ऑफ लिव्हिंगचे 'सहज समाधी ध्यान' सत्र उत्साहात 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नवगण महाविद्यालयात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपाशीर्वादाने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान श्री. रत्नेश्वर शेटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय 'सहज समाधी ध्यान' सत्र उत्साहात संपन्न झाले. तब्बल ४२ जणांनी या कोर्सचा लाभ घेतला.


प्रत्येकाने खूप आनंदाच्या क्षणी तसेच एखाद्या कामात पूर्ण बुडून गेलेले असताना असा अनुभव घेतला असेल की ध्यानाचा एक क्षण असा येतो जेंव्हा मन खूप हलके आणि तरल होते. आपण जरी असे क्षण अनुभवले असेल तरी आपण आपल्या इच्छेने तो पुन्हा पुन्हा अनुभवू शकत नाही. सहज समाधी ध्यान आपल्याला तो अनुभव पुन्हा पुन्हा कसा मिळवावा हे शिकवतो. सहज समाधी ध्यान मध्ये सहभागी होणाऱ्याला तणावापासून तत्काळ मुक्ती मिळते, मन खोलवर मोकळे होते आणि सर्व शरीराला पुनर्नवे करते.


'सहज' एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ नैसर्गिक किंवा सुलभ असा आहे. 'समाधी' ही एक खूप खोलवर अशी प्रसन्न ध्यानाची स्थिती आहे. 'सहज समाधी ध्यान 'म्हणजे ध्यानाची नैसर्गिक सुलभ प्रक्रिया होय.


हे ध्यान सतत केल्याने शांती, ऊर्जा आणि दिवसभर टिकणारी सजगता निर्माण होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते. योगाबरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो. जागृत / सचेतन  मन आत्म्यात विलीन होते व गहन विश्रांतीचा अनुभव येतो. जेव्हा मन शांत होते तेव्हा सर्व तणाव निघून जातात आणि मग एकाग्रता वाढून तुम्ही आरोग्यपूर्ण होता.


यासर्व गोष्टींची अनुभूती उपस्थित साधकांनी घेतली. तीन दिवस सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान दोन बॅचमध्ये 'सहज समाधी ध्यान' कोर्स संपन्न झाला. कोर्स नंतर काही सहभागी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यासाठी परळी वैजनाथ येथील आय.सि. शिरीष चौधरी व अंबाजोगाई येथील आय.सि. पांडे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी परिश्रम घेतले.


सहज समाधी ध्यानाने नवीन ऊर्जा संचारली : ईटके गुरुजी

सन २००३ पासून नित्यनेमाने मी सुदर्शन क्रिया करतो. मात्र गेल्या तीन दिवसांत मला कमालीची शांतता लाभली आहे. रत्नेश्वर शेटे यांनी केलेले मार्गदर्शन अमूल्य आहे. यापुढे मी दररोज सहज समाधी ध्यान नक्की करेन असे मनोगत यावेळी जेष्ठ नागरिक ईटके गुरुजी यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार