खा.शरद पवार यांची बीड येथे सभा

परळीतील नियोजन बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा-अॕड.जीवनराव देशमुख

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या बीड येथील होणाऱ्या सभेच्या तयारीसाठी परळीत बैठकीचे आयोजन कारण्यात आले आहे. तरी परळी मतदारसंघतील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी  कार्यकर्त्यांनी बैठकीलस मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते  अॕड.जीवनराव देशमुख यांनी केले आहे.

         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  खा.शरदचंद्रजी पवार  यांची बीड येथे गुरुवार दि.17 ऑगस्ट 2023 रोजी  सभा होणार असून या भव्य सभेच्या पूर्वतयारी करिता शुक्रवार दि. 11 ऑगस्ट 2023  रोजी सायंकाळी 05.00 वाजता अक्षदा मंगल कार्यालय, परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षिरसागर,  युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सौ.सुदामतीताई रत्नाकर  गुट्टे, जेष्ठ नेते एस.ए.समद यांच्या उपस्थितीत होणार असून या बैठकीला परळी मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते  अॕड. जीवनराव देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !