मणिपुर मधील जातीय हिंसा व महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थी व युवक युवतींची तीव्र निदर्शने

एसएफआय, डीवायएफआय विद्यार्थी युवक संघटनेचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने


परळी / प्रतिनिधी


मणिपुर मधील जाती हिंसा थांबवून केंद्र सरकारने तेथील राज्य सरकार बरखास्त करावे, कुकी आदीवासी महिलांची नग्न धिंड काढणार्‍या जमावावर त्यांना शोध घेऊन  गुन्हे दाखल करावेत. या गुन्हेगारांना फासावर लटकवा या प्रमुख मागणीसाठी परळी येथे बुधवार, दि.02 ऑगस्ट रोजी एसएफआय, डीवायएफआय या विद्यार्थी युवक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज परळी येथे  जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करून निवेदन देण्यात आले.


एसएफआय, डीवायएफआय या विद्यार्थी,युवक,युवती संघटनेच्या वतीने बुधवार रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, केंद्र सरकारने कुकी आदिवासींचे आरक्षण गैर आदिवासी मैतई जातीस देणे बाबत आश्वासन देऊन दोन भिन्न जात जमातीत आग लावली, संपुर्ण देशात लोकांचे जिवन जगण्याचे प्रश्न सोडून हिंदु, मुसलमान, हिंदु, खिश्चन आणि हिंदु, मधल्या मागास जाती यांच्यात जातीय, धार्मिक आणि समाजिक विष पेरून एक प्रकारचा सांप्रादायीक उन्माद निर्माण केला आहे. परिणामी देश जात आणि धर्माच्या विद्वेषात जळत आहे. परिणामी, आदिवासींचे 300 प्रार्थना स्थळे जाळली गेली, 50 हजार घरे जाळून खाक केली.


असंख्य माणसे कॅम्पमध्ये आश्रयास आहेत, राज्य सरकारने या हिंसेला आणि अराजकास फूस लावून माणसापासून माणूस परका केला. मे महिन्यात मैतेई समूहाने तीन महिलांचे अपहरण करून बलात्कार तर केलाच पण त्या आधी त्याची विवस्त्र धिंड काढली. देशात आणि राज्यात लोकशाही आणि सांवैधनिक संस्थांची मोडतोड करून भारतीय संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निदर्शनानिमित्त आम्ही मणिपूर राज्य बरखास्त करून तेथील दंगाई व गुन्हेगारांना फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली . निवेदन देण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.


यावेळी  कॉ.ऍड.परमेश्वर गीते,कॉ.प्रकाश चव्हाण, कॉ.प्रवीण देशमुख, नंदू देशमुख, कॉ.जालिंदर गिरी, ज्ञानेश्वर सोळंके,अमर सोळंके,गोविंद सोळंके, केशव मुंडे, डी.वाय.एफ.आय जिल्हा सचिव कॉ.विशाल देशमुख, मनोज स्वामी,बाळासाहेब शेप SFI जिल्हाउपाध्यक्ष अंकुश कोकाटे, हनुमंत शिंदे डी वाय एफ आय परळी तालुका अध्यक्ष कॉ.मनोज देशमुख, तालुका सचिव कॉ.विजय घुगे, तालुका उपाध्यक्ष कॉ.मुंजा नवघरे कॉ. सिद्राम सोळंके यांच्यासह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी,युवक,युवती चळवळीतील कार्यकर्ते व मानवतेवर प्रेम करणारे नागरिक सहभागी झाले होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !