परचुंडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी-भीमाशंकर नावंदे


 परचुंडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे  वाटप


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

जातीय वर्ण भेदाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केवळ दीड दिवस शाळा शिकणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.त्यांच्या लेखनातून शोषितांच्या संघर्षमय जीवनाला ऊर्जा मिळते. अन्यायविरोधी लढण्याची प्रेरणा मिळते. जगविख्यात थोर साहित्यिकाची आज १०३ वी जयंती आहे. त्यांनी मांडलेल्या प्रखर साहित्यातून अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा कायम मिळते, असे विचार प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरआप्पा नावंदे यांनी व्यक्त केले.


आज मंगळवार दिनांक 29.08.2023 रोजी परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री नावंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी  प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरआप्पा नावंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान कमिटीच्या वतीने जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमास उपसरपंच बाळासाहेब थोरात, मा.उपसरपंच वैजनाथ पत्रवाळे, गावचे ज्येष्ठ नागरिक सुभाष दादा रुपनर, माऊली गडदे सर ,देवराव पत्रवाळे, नानासाहेब रुपनर , रामा सरांडे, व्यंकट गडदे पाटील, कमलाकर नावंदे , प्रेस फोटोग्राफर गणेश पत्रवाळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी, पालक व गावातील सर्व महिला, पुरुष, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार