आरोपींना अटक करण्याची फिर्यादीची मागणी

 दुसऱ्याची जमीन हडपण्यासाठी खोटा करारनामा केला ; परळीत दोन जणावर गुन्हा दाखल !



परळी वैजनाथ

दहा रुपयांच्या बाॅंडच्याआधारे मालक नसतानाही दुसऱ्याच्या जमीनीचा विक्रीचा खोटा करारनामा तयार करून बनावट दस्तऐवज बनवून एकाची शेतजमीन हडपण्याचा कट करून  फसवणूक  केल्याच्या आरोपावरून परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.


थोडक्यात वृत्त असे की, याबाबत परळी येथील फिर्यादी प्रदिप पुरूषोत्तम नव्हाडे  यांनी दिलेल्या फिर्यादीत  7 ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांना अंबाजोगाई येथील न्यायालयाचे समन्स मिळाले तेव्हा त्यांना धक्का बसला कारण त्यांच्या मालकी व कब्जातील मौजे परळी शिवारातील जमीन सर्वे नंबर 245/2 मधील 1 हेक्टर 07 आर जमीनी विक्रीचा खोटा करारनामा सुभाष राजाराम नव्हाडे यांनी व इतरांनी आरोपी महमंद कलिमोददीन महमंद सलीमोददीन व महंमद हलिमोददीन महमंद सलीमोददीन यांना करुन दिल्याबद्दल माहिती मिळाली.  त्याबाबत अंबाजोगाई येथील न्यायालयात खोटा दावा दाखल केला.याबाबत फिर्यादीने आरोपींना जाब विचारला असता तुला काय करायचे आहे आम्ही चोराकडुन ताजमहाल सुध्दा विकत घेऊ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.फिर्यादीच्या जमीनीचे आपणच मालक असल्याचे दाखवून बनावट दस्तऐवज बनवून फिर्यादीची फसवणूक केली वगैरे मजकुरावर परळी ग्रामीण पोलिस स्टेशनला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा गु रं न 194/2023 गुन्हा कलम 420 468 467 471 34 भा दं वी अन्वये गुन्हा दाखल झाला असून परळी ग्रामीण पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.


आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ

सदर गुन्हा दाखल होऊन दिड महिना लोटला तरीही परळी ग्रामीण पोलिस आरोपींना अटक करत नाहीत.आरोपी राजरोसपणे फिरत आहेत व फिर्यादीला शेतात अडवा अडवी करत आहेत. फिर्यादीने आरोपी पासुन जीविताला धोका आहे म्हणून पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार अर्ज दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार